“दरबार ते डिजिटल – भारतीय शास्त्रीय संगीताची नवी दिशा”

भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा हजारो वर्षांची आहे. बदलत्या काळानुसार या संगीताने नवनवीन स्वरूप स्वीकारत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रख्यात व्हायोलिन वादक आणि Centre for Research & Promotion of Indian Music (CRPIM) चे अध्यक्ष डॉ. रतिश तागडे भारतीय शास्त्रीय संगीताला आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या पिढीशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत.

डॉ. तागडे यांनी यापूर्वी भारतातील पहिले २४ तासांचे शास्त्रीय संगीत वाहिनी “Insync” सुरू केले होते. त्या काळात ही एक अभिनव कल्पना मानली गेली, कारण शास्त्रीय संगीतासाठी स्वतंत्र प्रसारण मंच उपलब्ध नव्हता. या वाहिनीच्या माध्यमातून भारत आणि जगभरातील रसिकांपर्यंत सातत्याने शास्त्रीय संगीत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याच विचाराला पुढे नेत त्यांनी Centre for Research & Promotion of Indian Music (CRPIM) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट भारतीय संगीताच्या अभ्यास, संशोधन आणि प्रसाराला संस्थात्मक स्वरूप देणे आहे. Baithak Network या उपक्रमाच्या माध्यमातून CRPIM शास्त्रीय संगीताच्या अंतरंग बैठकींची परंपरा पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे, जिथे कलाकार आणि रसिक यांच्यात जवळचा संवाद साधता येतो.

आज तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या काळात Artificial Intelligence (AI) देखील संगीत क्षेत्रात प्रवेश करत आहे. डॉ. तागडे यांचे मत आहे की भारतीय शास्त्रीय संगीताची खरी ओळख राग विस्तार आणि इम्प्रोव्हायझेशनमध्ये आहे. पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत बहुधा लिखित sheet music वर आधारित असते, तर भारतीय संगीत गुरु-शिष्य परंपरेतून विकसित झाले आहे. त्यामुळे AI कडे एका डिजिटल शिष्य म्हणून पाहता येऊ शकते, ज्याला योग्य प्रकारे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

डॉ. तागडे यांनी Swiss School of Business and Management, Switzerland येथून डॉक्टरेट पूर्ण केली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय होताडिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पारंपरिक संगीतकारांसाठी अधिक प्रभावी राजस्व मॉडेल कसे विकसित करता येतील.

आजची Gen Z पिढी प्रामुख्याने मोबाईल आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संगीत ऐकते. विशेष म्हणजे अनेक तरुण सोशल मीडियावर शास्त्रीय संगीताच्या रील्स तयार करताना दिसतात. यावरून स्पष्ट होते की नवी पिढी या संगीतापासून दूर जात नाही, तर नव्या माध्यमांतून त्याच्याशी जोडली जात आहे.

डॉ. तागडे यांच्या मते, इतिहासात अनेक बदल झाले तरी भारतीय शास्त्रीय संगीताने आपली मौलिकता आणि प्रामाणिकता कायम राखली आहे. परंपरा आणि तंत्रज्ञान यांच्यात योग्य संतुलन राखले, तर हे संगीत भविष्यात आणखी व्यापकपणे जगभर पोहोचू शकते.

← Back
Link copied!
Awesome Image

About Us

CRPIM is a not-for-profit organisation devoted to preserving and promoting the rich heritage of Indian classical music.

Get Consultation

Contact Us

  • 6th floor unit no 629 laxmi plaza building Laxmi industry estate New link rd Andheri west near by sab tv line Andheri west 53
  • +91-9821240401
  • example@mail.com
  • Week Days: 09.00 to 18.00 Sunday: Closed